गोष्ट माझ्या एकटीची

गोष्ट माझ्या एकटीची
सुरुवातीपासून शेवतपर्यंतची

थोडीशी अलीकडची
थोडीशी पलीकडची
कधी भरून वाहणाऱ्या
कधी ठक्क अटलेल्या
किनाऱ्यावर घट्ट उभी
गोष्ट माझ्या एकटीची
उगमापासून अंतपर्यंतची

कायम ची असलेली
अधून मधून असणारी
जीव गुंतलेली
सगळीच पात्र गोष्टीतली
गोष्ट मात्र माझ्या एकटीचीच
सुरुवातीपासून शेवटपर्यंतची

Comments